Chess Olympiad 2024: चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने इतिहासात पहिल्यांदाच जिंकले सुवर्णपदक; डी गुकेशची चमकदार कामगिरी

बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारतीय खेळाडू डी गुकेशने चमकदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. शेवटच्या सामन्यात अमेरिकेला पराभूत केल्यानंतर 19 गुणांसह पहिले स्थान मिळविले.

Chess Olympiad 2024: चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने इतिहासात पहिल्यांदाच जिंकले सुवर्णपदक; डी गुकेशची चमकदार कामगिरी
Photo Credit- X

Chess Olympiad 2024 India Wins First Gold Medal: बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताने ऐतिहासिक पहिल्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केला आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने (D Gukesh) बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 (Chess Olympiad 2024)मध्ये इतिहास घडवला आहे. अंतिम सामन्यात शानदार खेळ करत त्याने सुवर्णपदक जिंकले. गुकेशने चेस ऑलिम्पियाडमधील 8 सामने जिंकले तर 2 ड्रॉ सामने खेळले. भारतीय संघात गुकेश डी, आर प्रज्ञानंद, अर्जुन इरिगसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन यांचा समावेश आहे.

अर्जुन इरिगसी आणि डी गुकेश यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनला यूएसए विरुद्ध दोन गुणांचा फटका बसल्यानंतर भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित झाले. भारतीय संघाने स्पर्धेची स्वप्नवत सुरुवात केली आणि गेल्या सीझनमध्ये चॅम्पियन उझबेकिस्तानविरुद्ध बरोबरी साधण्यापूर्वी पहिले आठ सामने जिंकून चॅम्पियन संघ असल्याची ग्वाही दिली.

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रत्येक फेरीत दोन संघ एकमेकांविरूद्ध भिडतात. जर एका संघाने फेरी जिंकली तर त्याला दोन गुण मिळतात, आणि जर तो सामना अनिर्णित राहिला तर त्याला एक गुण मिळतो. या कारणास्तव भारताचे 10 फेऱ्यांनंतर एकूण 19 गुण झाले होते. सलग 8 फेऱ्या जिंकून भारताचे एकूण 16 गुण झाले. पण 9 व्या फेरीत भारताला उझबेकिस्तानसोबत ड्रॉ खेळावा लागला, त्यामुळे भारताच्या खात्यात एक गुण जमा झाला होता. असे एकूण 17 गुण झाले होते. त्यानंतर अमेरिकेला पराभूत केल्यानंतर 19 गुणांसह पहिले स्थान मिळविले.

 डी गुकेशची चमकदार कामगिरी

2022 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने मायदेशात कांस्यपदक जिंकले. त्याआधी 2014 मध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते. बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशने अमेरिकेच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करून भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक जवळपास निश्चित केले होते. भारताने १०व्या फेरीच्या सामन्यात अमेरिकेचा 2.5-1.5 असा पराभव केला होता.

(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2024 07:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).