भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत (Urvashi Rautela) चर्चेत आहे. उर्वशीच्या एका वक्तव्यानंतर दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले. पंतची इन्स्टा स्टोरीचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला ज्यामध्ये असे लिहिले होते की 'मला सोड बहिण, खोटे बोलण्याची पण एक मर्यादा असते आता हा वाद पुढे नेत उर्वशी रौतेलाने ट्विट करून उत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये उर्वशीने ऋषभ पंतला छोटू भैया असे संबोधले असून पंतला क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला आहे. उर्वशीने तिच्या ताज्या ट्विटमध्ये लिहिले की, 'छोटू भैयाने किक्रेट खेळावे. मी काही मुन्नी नाही की तुझ्यासाठी बदनाम होवू. यंग किड्डो डार्लिंग. सोशल मीडियावर दोघांमध्ये सुरू झालेल्या या शाब्दिक युद्धाबाबत सोशल मीडियावर वेगळेच वातावरण आहे. ट्विटरवर चाहते वेगवेगळे मीम्स बनवून संपूर्ण वादाचा आनंद घेत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)