टीम इंडिया आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ पुढील दीड महिना या कसोटी मालिकेत व्यस्त असतील. येथे इंग्लंड संघ आपल्या बेसबॉल शैलीने टीम इंडियाच्या मजबूत घरच्या कसोटी विक्रमाला आव्हान देईल. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 64.3 षटकांत केवळ 246 धावा करू शकला नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने अवघ्या 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर रोहित शर्मा 24 धावा करुण बाद झाला आहे. टीम इंडियाचा स्कोअर 82/1.
1ST Test. WICKET! 12.2: Rohit Sharma 24(27) ct Ben Stokes b Jack Leach, India 80/1 https://t.co/HGTxXf8b1E #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 25, 2024
He has raced past FIFTY! 👏 👏
This has been a blitz of a knock from @ybj_19 to notch up his 2⃣nd Test half-century ⚡️ ⚡️
Follow the match ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Pail01CRRw
— BCCI (@BCCI) January 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)