India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघादरम्यान पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जात आहे. यासोबतच टीम इंडिया आणि इंग्लंड संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) च्या नवीन हंगामाची सुरुवातही केली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. त्याने 144 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह शतक पूर्ण केले. भारताचा स्कोर 209/2
💯 for Yashasvi Jaiswal! 👏 👏
5th hundred in Test cricket! 👍 👍
This has been a fine knock in the series opener! 🙌 🙌
Updates ▶️ https://t.co/CuzAEnAMIW#TeamIndia | #ENGvIND | @ybj_19 pic.twitter.com/pGmPoFYik6
— BCCI (@BCCI) June 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)