रविवारी ताब्यात घेतलेल्या सर्व महिला कुस्तीपटू आणि आंदोलकांची सुटका करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने संध्याकाळी उशिरा ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, "पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगट आणि संगीता फोगट यांच्यासह महिला आंदोलकांना सोडले आहे." दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथे झालेल्या हाणामारीच्या संदर्भात निदर्शने आयोजक आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 147, 149, 186, 188, 332, 353, PDPP कायद्याच्या कलम 3 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)