Shafali Verma: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळण्याबाबत विचारले असता, भारताची सलामीवीर शफाली (Shafali Verma) म्हणाली, “जेव्हा मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (AUS) खेळते तेव्हा असे वाटते की मी पुरुषांविरुद्ध खेळत आहे, कारण त्यांचा खेळच असा आहे की ते विरोधी संघाच्या छोट्याशा चुकीचाही ते फायदा घेतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या सामन्यात आम्हाला आघाडीवर राहावे लागेल. तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल, ज्यावर तुमचा विश्वास आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना मला खूप काही शिकायला मिळाले. मला त्यांच्याविरुद्ध खेळायला आवडते. शफाली आज संध्याकाळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिचा 50 वा टी-20 सामना खेळणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 2-1 ने पुढे आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)