IND vs BAN 2nd Test 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. लंच ब्रेकनंतर नऊ षटके झाल्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ पाऊस आणि खराब प्रकाशामुळे रद्द घोषित करण्यात आला. पहिल्या दिवशी बांगलादेश 3 विकेट गमावून 107 धावांवर आहे. तर भारताकडून आकाश दीपने (Akash Deep) दोन विकेट घेतल्या आहे. त्याआधी आकाश दीपने सलामीवीर झाकीर हसनला त्याच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालकडे स्लिपमध्ये झेलबाद केले. हसनला खातेही उघडता आले नाही. यानंतर त्याने दुसरा सलामीवीर शदमान इस्लामलाही बाद केले. मात्र, शदमानची बाद करण्याची पद्धत थोडी मनोरंजक होती. चेंडू शदमानच्या पॅडला लागला. गोलंदाजाने एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील केले होते. मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावले. पण डीआरएसमुळे अंपायरचा निर्णय बदलला गेला आणि रोहित शर्माही (Rohit Sharma) आश्चर्यचकित झाला.
😮 When the giant screen showed three Reds ⭕⭕⭕
Akash Deep gets his second courtesy of a successful DRS!
Live - https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZyGJfgBdjW
— BCCI (@BCCI) September 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)