ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) आयसीसी पुरस्कारामध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद शमीचा पराभव केला आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताला वेदना देणारा हेड नोव्हेंबर महिन्यासाठी आयसीसीचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू ठरला. या पुरस्कारासाठी त्याला त्याचाच सहकारी मॅक्सवेल आणि भारतीय गोलंदाज शमी यांच्याशी स्पर्धा मिळाली. विश्वचषकादरम्यान मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले होते. शमीने विश्वचषकात सर्वाधिक बळी घेतले होते, तर नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये हेडने 220 धावा केल्या होत्या, ज्यात एक अर्धशतक आणि एक शतक होते. त्यामुळे तो पहिलाच खेळाडूचा महिना पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला. हेडने वर्ल्ड कप फायनलमध्येही 137 रन्सची इनिंग खेळली होती. तो ऑस्ट्रेलियाच्या विजेतेपदाचा हिरो ठरला होता. हेड फायनलमध्ये सामनावीर ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीतही हेड सामनावीर ठरला होता. उपांत्य फेरीतही त्याने 62 धावा केल्या आणि 2 बळी घेतले. (हे देखील वाचा: Virat Kohli Stats: विराट कोहलीने टीम इंडियासाठी एका कॅलेंडर वर्षात केल्या सर्वाधिक 1000+ विजयी धावा, येथे पाहा 'रन मशीन'ची आश्चर्यकारक आकडेवारी)
A #CWC23 hero has been crowned the ICC Men’s Player of the Month for November 2023 🔥
— ICC (@ICC) December 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)