अँजेलो मॅथ्यूजला टाइमआऊट बाद देण्यात आल्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनलाही अनेक माजी खेळाडूंच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर बांगलादेश संघाच्या खेळाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मॅथ्यूजला अशा प्रकारे आऊट दिल्याने श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांनीही प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. अँजेलो मॅथ्यूजचा भाऊ ट्रेविनने डेक्कन क्रॉनिकलला सांगितले की, आम्ही खूप निराश झालो आहोत. शाकिब अल हसनने कोणतीही खिलाडूवृत्ती दाखवली नाही. शाकिबचे श्रीलंकेत स्वागत होणार नाही. तो येथे कोणताही आंतरराष्ट्रीय किंवा लंका प्रीमियर लीग सामना खेळण्यासाठी आला तर त्याच्यावर दगडफेक केली जाईल किंवा त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. (हे देखील वाचा: National Game Goa 2023: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पदतालिकेत अव्वल, पाहा रॅंक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)