इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 40 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स दहाव्या तर सनरायझर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारे दोन्ही संघ सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 197 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सलामीवीर अभिषेक शर्माने सर्वाधिक 67 धावांची तुफानी खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल मार्शने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 198 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्कोर 112/2.
Match 40. WICKET! 12.3: Manish Pandey 1(3) st Heinrich Klaasen b Abhishek Sharma, Delhi Capitals 115/3 https://t.co/iOYYyw2zca #TATAIPL #DCvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)