विश्वचषक २०२३ च्या ४२व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, गेल्या सामन्यात भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत संघ पुन्हा गती मिळविण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर नसला तरी त्यांच्यासाठी समीकरणे खूपच कठीण आहेत. अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 438 किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल. दरम्यान, अफगाणिस्तानने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानला 45 धावांवर तिसरा धक्का बसला. केशव महाराजने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला यष्टिरक्षक डिकॉकवी झेलबाद केले. अफगाणिस्तानचा स्कोर 78/3
Maharaj strikes again! Afghanistan are three down#SAvAFG #CWC23 https://t.co/ojEDxKbSGH
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)