BAN Beat IND: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत भारताचा पराभव झाला. या पराभवाने टीम इंडियाच्या हातातून मालिकाही गेली. मात्र या पराभवानंतरही या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जे केले त्याचे महत्त्व उद्ध्वस्त करता येणार नाही. या सामन्यात तो सलामीला उतरला नाही कारण त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा भारताच्या 7 विकेट पडल्या होत्या. आणि तेव्हा तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याच्या आक्रमक फलंदाजीने सगळ्यानां वाटल की तो सामना जिंकुन देईल पण असे काही झाले नाही रोहितने 28 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. कठीण परिस्थितीतही रोहितने चांगली फलंदाजी केली. त्याने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सर्वांची मने जिंकली.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)