IND vs AFG T20 Series: टीम इंडिया (Team India) आता या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या (ICC World Cup 2023) तयारीला सुरुवात करणार आहे. लवकरच अफगाणिस्तान संघ भारत दौऱ्यावर येणार असून तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका (IND vs AFG T20 Series) खेळवली जाणार आहे. ही मालिका 11 जानेवारीपासून मोहालीत सुरू होणार आहे. या मालिकेसाठी आज म्हणजेच 7 जानेवारीला टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) वर्षभरानंतर संघात परतले आहेत. रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Series 2024: टीम इंडियाला मोठा धक्का, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत हा खेळाडू बाहेर)
अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग .
🚨 NEWS 🚨#TeamIndia’s squad for @IDFCFIRSTBank T20I series against Afghanistan announced 🔽
Rohit Sharma (C), S Gill, Y Jaiswal, Virat Kohli, Tilak Varma, Rinku Singh, Jitesh Sharma (wk), Sanju Samson (wk), Shivam Dube, W Sundar, Axar Patel, Ravi Bishnoi, Kuldeep Yadav,…
— BCCI (@BCCI) January 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)