IND vs AFG T20: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात 11 जानेवारीपासून 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ भारतात दाखल झाला आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू या मालिकेतून बाहेर पडला आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikad) अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी उपलब्ध होणार नाही. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, गायकवाड सध्या बोटाच्या दुखापतीने त्रस्त आहे. 19 डिसेंबर रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गायकवाडला बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो वनडेपाठोपाठ कसोटी मालिकेतूनही बाहेर पडला होता. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Head To Head Record: भारत आणि अफगाणिस्तान टी-20 मालिकेत कोण आहे वरचढ? येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)