2007 च्या T20 विश्वचषकाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात जोगिंदर शर्माचे नाव ताजे होते. जोगिंदर शर्मानेच फायनल मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचे ओव्हर टाकून टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते. जोगिंदर शर्माने आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर (Joginder Sharma Retirement) केली आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे. 2007 चा टी-20 विश्वचषक भारताला जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. या विश्वचषकानंतर हा खेळाडू टीम इंडियाचा भाग बनला नाही.
Announced retirement from cricket 🙏😘Thanks to each n everyone for ur spot and love ❤️🙏@bcci @icc @haryana cricket Association 🙏 pic.twitter.com/QJSXoojXn5
— Joginder Sharma 🇮🇳 (@MJoginderSharma) February 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)