जागतिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात मोठे विक्रम करणारा संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया. पण आज ऑस्ट्रेलियाच्या सिडनी थंडरने एक नवल वाटेल असाच विक्रम आपल्या नावी नोंदवला आहे. ऐकायला जरा विचित्र वाटेल पण ऑस्ट्रेलियाच्या सिडनी थंडरने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी इनिंगचा रेकॉर्ड मोडला आहे. बिग बॅश लीग (BBL) 2022-23 मध्ये सिडनी थंडरअॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध केवळ 15 धावा करत ऑल आउट झालेत. यापूर्वी २०१९ मध्ये तुर्की २१ धावांवर ऑल आउट झाला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या सिडनी थंडरने जागतिक क्रिकेट आकडेवारीतील सगळे रेकॉर्ड मोडत एवढ्या कमी धावांवर ऑल आउट होणारा एकमेव संघ ठरला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)