टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज अहमदाबादमध्ये खेळला गेला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी खिशात घातली. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघाची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. त्याचवेळी स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी दाखवली. त्याने किवी संघाच्या दोन फलंदाजांना झेलबाद करून संघाच्या अडचणी बऱ्याच अंशी संपवल्या.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)