Delhi Capitals vs Mumbai Indians, TATA IPL 2025 63rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 63 वा सामना आज म्हणजेच 21 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या हंगामात मुंबईची धुरा हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे. तर, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, परंतु दिल्लीसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्ली कॅपिटल्स आज मुंबईला हरवू शकले नाही, तर या हंगामातील त्यांचा प्रवास इथेच संपेल आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित करेल. दरम्यान, दिल्लीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 𝑻𝑶𝑺𝑺 𝑼𝑷𝑫𝑨𝑻𝑬 🚨
DC skipper Faf du Plessis has won the toss and elected to bowl first against MI! 💙🪙#MIvDC #FafduPlessis #IPL2025 #Sportskeeda pic.twitter.com/uV3DXmaHvu
— Sportskeeda (@Sportskeeda) May 21, 2025
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)