Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans, 19th Match: टाटा आयपीएल 2025 चा (TATA IPL 2025) 19 वा (Indian Premier League 2025) सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे, तर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 4 सामने खेळले असुन एकच सामना जिंकला आहे. याशिवाय, ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असुन एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो. दरम्यान, गुजरातने टाॅस जिकंन घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंडू मेंडिस, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)