IND vs SL 2nd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला (IND vs SL 2nd ODI) जात आहे. याआधी दोन्ही संघांमधील पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला होता. आता दुसऱ्या सामन्यातून दोन्ही संघांना मालिकेतील पहिला विजय मिळवायचा आहे. आज जर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर टीम इंडिया विजयाचे शतक ठोकेल. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेवून 50 षटकात 240 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर, दुसरीकडे श्रीलंकेकडून कामिंदू मेंडिसने सर्वाधिक 40 धावा केल्या. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 241 धावा करायच्या आहेत.
2ND ODI. WICKET! 49.5: Kamindu Mendis 40(44) Run Out Shreyas Iyer, Sri Lanka 239/8 https://t.co/KTwPVvU9s9 #SLvIND #2ndODI
— BCCI (@BCCI) August 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)