भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) रांची (Ranchi) येथे खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यांचा नियमित कर्णधार टेंबा बावुमा या सामन्यात खेळत नाही. त्यांच्या जागी केशव महाराज कर्णधार आहेत. अष्टपैलू शाहबाज अहमदला भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने रांचीमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 50 षटकांत 7 विकेट गमावून 278 धावा केल्या. आफ्रिकेकडून रीझा हॅड्रिंक्स (74) आणि एडन मार्कराम (79) यांनी अर्धशतके झळकावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)