आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. विश्वचषकाचा विजेता रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला मिळेल. रविवारी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे कोणीतरी बरोबर म्हटले आहे. असाच काहीसा प्रकार 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळाला. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी, देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ज्योतिष अॅप AstroTalk चे संस्थापक आणि CEO पुनीत गुप्ता यांनी विश्वचषक फायनलच्या निमित्ताने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी विशेष पुरस्कार जाहीर केला आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर Astrotalk आपल्या ग्राहकांच्या वॉलेटमध्ये 100 कोटी रुपये वितरित करेल. ही रक्कम सर्व वापरकर्त्यांमध्ये समान प्रमाणात वितरीत केली जाईल. (हे देखील वाचा: IND vs AUS ICC World Cup 2023 Final: अंतिम सामन्यात विराट कोहलीला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, हा अनोखा विक्रम करणार आपल्या नावावर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneet Gupta (@ipuneetgupta)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)