आयसीसी विश्वचषक 2023 च्या 21व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे (IND vs NZ) संघ आज आमनेसामने आहेत. हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड हे संघ या विश्वचषकाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम संघ आहेत आणि दोघांनी 4-4 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत कोणत्या संघाचा विजय रथ थांबणार हे पाहणे विशेष ठरणार आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाला पहिला मोठा धक्का बसला. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे 0 धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. दरम्यान, श्रेयस अय्यरने डेव्हॉन कॉनवेचा अप्रतिम झेल घेतला. झेल घेतल्यानंतर त्याने पदकासाठी हातवारे केले. गेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने बांगलादेशविरुद्धही शानदार झेल घेतला होता. त्याला संघाकडून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला.
Shreyas Iyer asking for the medal from the fielding coach after the catch. pic.twitter.com/cOkNd5tubx
— Johns. (@CricCrazyJohns) October 22, 2023
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)