महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक समजला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक जिंकला. याशिवाय त्याने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवरही कब्जा केला होता. 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.
आता चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी आपला क्रिकेटमधील आदर्श कोण आहे हे सांगत आहे. माजी कर्णधाराने सांगितले की, सचिन तेंडुलकर हा आपला आदर्श आहे. धोनी म्हणतो, ‘माझ्यासाठी क्रिकेटचा आदर्श नेहमीच सचिन तेंडुलकर राहिला आहे. मी नेहमी सचिन तेंडुलकरला फलंदाजी करताना पाहायचो. मला त्याच्यासारखे खेळायचे होते. पण नंतर माझ्या लक्षात आले की, मी त्याच्यासारखे खेळू शकत नाही. लहानपणापासून सचिन माझा क्रिकेटमधील आदर्श होता.’
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)