Sachin Tendulkar Visit to Kashmir: क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) शनिवारी काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात पोहोचला. सचिनसोबत त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि पत्नी अंजली तेंडुलकरही (Anjali Tendulkar) होती. सर्वांनी तेथे असलेल्या माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच, सचिन तेंडुलकरही कुटुंबासह क्रिकेट बॅटच्या कारखान्यात गेला होता, तिथे त्याने क्रिकेटच्या बॅट्स पाहिल्या. सचिन तेंडुलकरचे तेथे असलेल्या घरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सचिनचे संपूर्ण कुटुंब पारंपारिक पद्धतीने बसून चहा पिताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)