Rohit Sharma Ganesh Chaturthi Celebration: क्रिकेटर रोहित शर्माने साजरी केली गणेश चतुर्थी; मंगलमय प्रसंगाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल (Watch Post)
रोहित शर्माने 'गणपती बाप्पा मोरया' या कॅप्शनसह शुभ प्रसंगाच्या सेलिब्रेशनचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आज महाराष्ट्रासह देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. आज घरोघरी गणपतींचे आगमन झाले. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही आपली घरी गणेश चतुर्थी साजरी केली. रोहित शर्माने 'गणपती बाप्पा मोरया' या कॅप्शनसह शुभ प्रसंगाच्या सेलिब्रेशनचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आशिया चषक 2023 मध्ये भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेवर वर्चस्व गाजवल्यानंतर रोहित शर्मा सध्या थोडा निवांत आहे. कर्णधार रोहितसाठी, आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 हा येणारा मोठा टास्क असणार आहे. (हेही वाचा: Lalbaugcha Raja 2023: बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यन लालबाग राजाच्या चरणी)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2023 08:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

