IND vs SL 1st ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुलला संधी दिली आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाने 50 षटकात 230 धावा केल्या आहे. भारताकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आहे. तर दुसरीकडे, श्रीलंकेकडून दुनिथ वेललागेने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 231 धावा करायच्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय सघांचा कर्णधार रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करुन आपले अर्धशतक पुर्ण केले आहे.
5⃣6⃣th ODI Fifty! 👏 👏
Rohit Sharma leading from the front! 👌 👌
Follow the Match ▶️ https://t.co/4fYsNEzO5N#TeamIndia | #SLvIND | @ImRo45 pic.twitter.com/vNXe5sdMJo
— BCCI (@BCCI) August 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)