Viral Video: तोंडावर मेकपचा थर, विमानतळावरचं मशीन हबकलं, ओळखच दाखवेना; महिलेची पंचाईत, कसा सुटला गुंता? तुम्हीच पहा

महिलेच्या चेहऱ्यावर इतका मेकअप होता की विमानतळाच्या फेस रेकग्निशन मशीनने तिला ओळखण्यास नकार दिला. पासपोर्ट फोटोशी तिचा चेहरा जुळवण्यासाठी महिलेला तिचा मेकअप काढावा लागला. ही मजेदार आणि धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: तोंडावर मेकपचा थर, विमानतळावरचं मशीन हबकलं, ओळखच दाखवेना; महिलेची पंचाईत, कसा सुटला गुंता? तुम्हीच पहा
makeup viral video (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम )

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ पाहून हासू आवरणे खूपचं कठीण होते. अलिकडेच इंटरनेटवर एका व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे, ज्यामध्ये एका महिलेच्या चेहऱ्यावर इतका मेकअप (Makeup) होता की विमानतळाच्या फेस रेकग्निशन मशीनने तिला ओळखण्यास नकार दिला. पासपोर्ट फोटोशी तिचा चेहरा जुळवण्यासाठी महिलेला तिचा मेकअप काढावा लागला. ही मजेदार आणि धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये एक महिला विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी वाट पाहताना दिसत आहे. जेव्हा ती चेहरा ओळखण्याच्या मशीनसमोर जाते तेव्हा मशीन तिचा चेहरा पासपोर्ट फोटोशी जूळत नाही. कारण, महिलेच्या चेहऱ्यावर मेकअपचा इतका जाड थर होता की तिचा खरा चेहरा मेकअपच्या मागे लपला होता. (हेही वाचा - RCB Fans Divorce Poster: 'RCB जिंकला नाही तर पतीला घटस्फोट देईल...'; सोशल मीडियावर महिला चाहत्याचे घटस्फोटाचे पोस्टर व्हायरल)

दरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्यांनी महिलेला मेकअप काढण्याची विनंती केली जेणेकरून त्यांची ओळख पटेल. व्हिडिओमध्ये महिला मेकअप काढताना दिसत आहे. या दरम्यान, महिलेचे खरे रूप पाहून, सर्वांनाचं आश्चर्य वाटले. व्हायरल व्हिडिओमध्ये, ही घटना चीनमधील शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे.

तोंडावर मेकपचा थर, विमानतळावरचं मशीन हबकलं - 

 

View this post on Instagram

 

A post shared by NAUGHTYWORLD (@naughtyworld)

घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, महिलेने वधूसारखा मेकअप केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @naughtyworld नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडिओवर कमेंट करून अनेकांनी आपली प्रतिक्रियाही दिली आहे. एका वापरकर्त्याने व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, 'मेकअपची जादू अशी आहे की मशीन देखील मूर्ख बनली.' दुसऱ्याने लिहिले की, 'मला वाटते की मशीनने योग्य काम केले, महिलेचा खरा चेहरा समोर आला.'

(The above story first appeared on LatestLY on May 31, 2025 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).