मुंबई मध्ये काल मुसळधार पावसाच्य सरी बरसल्यानंतर आज पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे. आयाएमडी कडून मुंबई, ठाणे शहराला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि आजुबाजूच्या भागात आज (27 मे) विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ येण्याचा अंदाज आहे. 30 मे पर्यंतच्या हवामान अंदाजात, आयएमडीने 27 मे साठी पालघरसाठी ग्रीन अलर्ट, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, हवामान संस्थेने 28 मे रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट आणि 29 आणि 30 मे रोजी ग्रीन अलर्ट देण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई शहरात आज कसं असेल हवामान?
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5… भेट घ्या. pic.twitter.com/8ySBTdy5CM
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 26, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)