Homeless Man Sets Himself on Fire |X/@dom_lucre)

Homeless Man Sets Himself on Fire: ब्राझीलमधील (Brazil) साओ पाउलो येथील साओ बेंटो मेट्रो स्टेशनवर (São Bento Metro Station) एका 74 वर्षीय बेघर व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये, मेट्रो कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रत्यक्षदर्शींमध्ये घबराट निर्माण झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांनी ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये, स्वतःला पेटवल्यानंतर तो व्यक्ती कोणतीही हालचाल न करता स्थिरपणे उभा असल्याचे दिसून येते. त्याच्याभोवती अनेक लोक घाबरून धावताना दिसतात. तथापि, व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीला कोणी वाचवले की वेळेवर मेट्रो अधिकाऱ्यांकडून मदत मिळाली याची पुष्टी होऊ शकलेली नाही. पीडित व्यक्ती या घटनेतून वाचली की नाही हे देखील स्पष्ट नाही.

मेट्रो स्टेशनवर बेघर व्यक्तीने स्वतःला पेटवलं, पहा व्हिडिओ -

एक्स वापरकर्त्याने @dom_lucre ने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, एक्सच्या ग्रोक एआयने व्हिडिओला प्रतिसाद दिला आणि म्हटले की, पोलिस या घटनेची चौकशी करत आहे. ब्राझीलमध्ये बेघरपणाचे संकट हा एक प्रमुख मुद्दा नोंदवला गेला आहे. ब्राझीलमधील बेघर लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.