RR vs GT IPL 2025 47th Match: आयपीएल 2025चा 47 वा (IPL 2025) सामना 28 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (GT vs RR) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने गुजरातचा 8 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 4 गडी गमावून 209 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने 84 धावा केल्या तर जोस बटलरने नाबाद अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात, वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक शतकाच्या जोरावर राजस्थानने 15.5 षटकांत 210 धावांचे लक्ष्य गाठले. या विजयासह राजस्थानने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. जर अपडेटेड पॉइंट टेबल बद्दल बोलायचे तर राजस्थान आठव्या स्थानावर पोहचला आहे. तर गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे.
येथे पाहा पॉइंट टेबल
IPL 2025 POINTS TABLE. 📈
- RCB continues their dominance at No.1 with 14 Points. pic.twitter.com/gjk7640OYG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 28, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)