IND vs ENG 1st Test Day 2: टीम इंडिया आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 23 षटकांत एक विकेट गमावून 119 धावा केल्या होत्या. टीम इंडिया अजूनही इंग्लंडपेक्षा 127 धावांनी मागे होती. इंग्लंडचा गोलंदाज जॅक लीचने एक विकेट घेतली. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 64.3 षटकांत केवळ 246 धावा करू शकला नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाचा स्टार फलंदांज केएल राहुने आपले शानदार अर्धशतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 219/3
Half-century for KL Rahul! 🙌
FIFTY Partnership 🆙 between KL Rahul & Shreyas Iyer 👌👌#TeamIndia 212/3
Follow the match ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#TeamIndia | #INDvENG | @klrahul | @ShreyasIyer15 @IDFCFIRSTBank pic.twitter.com/doaGOr4LUX
— BCCI (@BCCI) January 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)