इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 31वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत खेळलेल्या 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर पंजाबने 6 पैकी 3 सामने खेळले आहेत. शेवटचा सामना मुंबईने जिंकला होता. त्यामुळे तिला विजयी घोडदौड सुरू ठेवायला आवडेल. गेल्या सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जच्या संघाला चौथा मोठा धक्का बसला. सलामीवीर अथर्व तायडे 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पंजाब किंग्ज संघाचा स्कोअर 83/4.
Liam Livingstone ✅
Atharva Taide ✅
Piyush Chawla on a roll 😎#PBKS 4⃣ down now inside the first ten!
Follow the match ▶️ https://t.co/FfkwVPpj3s #TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/XbOTRrxAO9
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)