भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी (16 नोव्हेंबर) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळवला जात आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मैदानावर अंतिम सामना होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मैदानाच्या खेळपट्टीवर भारतासोबत अंतिम सामना खेळणाऱ्या संघाचा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अहमदाबादला येवू शकताता. दरम्यान, विश्वचषक 2023 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पहिला उपांत्य सामना भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या अव्वल चार संघांपैकी दोन संघांमध्ये झाला आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने आहेत. यातील विजयी संघ भारतासोबत अंतिम सामना खेळेल. या अव्वल दोन संघांमधील अंतिम सामन्यानंतरच विश्वविजेतेपदाचा निर्णय होणार आहे. (हे देखील वाचा: ICC World Cup 2023 Final: वर्ल्ड कप फायनलची क्रेझ! अहमदाबादमधील हॉटेलचे भाडे एक लाखाच्या पुढे, विमानाचे तिकीटही महागले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)