आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) अंतिम सामन्यात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतीय संघ सलग 10 विजयांसह अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावून पुनरागमन केले आणि सर्व सामने जिंकले. दोन्ही संघांनी विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, या मोठ्या सामन्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाला खास शुभेच्छा दिल्या आहे. ते म्हणाले, 'ऑल द बेस्ट टीम इंडिया! 140 कोटी भारतीय तुमचा जयजयकार करत आहेत. तुम्ही तेजस्वी व्हा, चांगले खेळा आणि खिलाडूवृत्तीची भावना कायम ठेवा.' (हे देखील वाचा: Ranveer - Deepika विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले, काही वेळात IND vs AUS सामन्याला होणार सुरुवात (Watch Video)
All the best Team India!
140 crore Indians are cheering for you.
May you shine bright, play well and uphold the spirit of sportsmanship. https://t.co/NfQDT5ygxk
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)