NZ vs PAK4th T20I: पाकिस्तान क्रिकेट संघाला सलग चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव (New Zealand Beat Pakistan) पत्करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने न्यूझीलंडला 159 धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमानांनी 7 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानसाठी ही चिंताजनक बातमी आहे, ते चारही सामने सहज हरले. बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. संघ आधीच मालिका गमावला होता, आता सलग चौथ्या पराभवानंतर संघावर मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. (हे देखील वाचा: India's Schedule In Under 19 WC 24: आयसीसी अंडर-19 विश्वचषकाला आजपासून सुरुवात, पाहून घ्या भारताचे वेळापत्रक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)