Pakistan Team Captain Change: टी-20 2024 च्या विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट संघाने (PCB) मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने आपला कर्णधार बदलला आहे. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर, अनुभवी खेळाडू बाबर आझमने सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. यानंतर शाहीन आफ्रिदीला (Shahin Afridi) टी-20 क्रिकेटचा कर्णधार बनवण्यात आले. पण आता टी-20 विश्वचषक 2024 जवळ आल्याने पाकिस्तानने पुन्हा आपला कर्णधारात बदल करुन आता पुन्हा एकदा बाबर आझमला (Babar Azam) कर्णधार बनवण्यात आले आहे. पीसीबीने शाहीन आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून बाबर आझमकडे ही जबाबदारी सोपवली आहे. अशा परिस्थितीत 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा निर्णय योग्य की अयोग्य हे पाहणे बाकी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)