ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान धास्तावले, आता 'PSL' चे उर्वरित सामने यूएईमध्ये होणार
गुरुवारी रावळपिंडीमध्ये पीएसएलमध्ये कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यात सामना होणार होता. पण स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ड्रोन पडल्यानंतर, एक आपत्कालीन बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर सामना पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
PSL 2025 Shifted to UAE: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. आणि पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर संपूर्ण देशात गोंधळ माजला आहे. याचा परिणाम पाकिस्तान सुपर लीगवरही झाला आहे. पीएसएलच्या 10व्या आवृत्तीतील उर्वरित सामने आता यूएईमध्ये हलवण्यात आले आहेत. पीसीबीने म्हटले आहे की उर्वरित पीएसएल सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जातील. गुरुवारी रावळपिंडीमध्ये पीएसएलमध्ये कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यात सामना होणार होता. पण स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ड्रोन पडल्यानंतर, एक आपत्कालीन बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर सामना पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला. लीगचे शेवटचे 8 सामने रावळपिंडी, मुलतान आणि लाहोर येथे होणार होते. पण देशातील वातावरण लक्षात घेता, पीसीबीने ही लीग दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
HBL PSL X remaining matches shifted to UAE
Read more: https://t.co/Fs5LiZ7oof#HBLPSLX
— PCB Media (@TheRealPCBMedia) May 8, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

