आज एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, (ICC Cricket World Cup 2023) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (PAK vs SA) यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. मुख्य म्हणजे हा सामना पाकिस्तान संघासाठी खूप महत्वाचा आहे, बाबर सेनेला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायला आवडेल. कारण आजचा सामनाही पाकिस्तान हरला तर त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग बंद होईल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ खूपच मजबूत स्थितीत आहे. स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांपैकी आफ्रिकेने 4 सामने जिंकले आहेत तर पाकिस्तान संघाने 5 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. विश्वचषकात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघाचा स्कोअर 86/3.
Mohammed Rizwan dismissed for 31 in 27 balls. pic.twitter.com/7EGxtTNTNs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)