Rahmanullah Gurbaz New Record: अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना हरला असला तरी आशियाई संघाने पुन्हा एकदा मन जिंकले. दरम्यान, 21 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने (Rahmanullah Gurbaz) 151 चेंडूत विक्रमी 151 धावा केल्या. या खेळीत त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. त्यापैकी एक विक्रम एमएस धोनीचा (MS Dhoni) होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, याआधी पाकिस्तानविरुद्ध इतर कोणताही यष्टिरक्षक फलंदाज 150 धावांचा आकडा पार करू शकला नव्हता. महेंद्रसिंग धोनीने यापूर्वी 2005 मध्ये विशाखापट्टणम येथे पाकिस्तानविरुद्ध यष्टिरक्षक म्हणून 148 धावांची खेळी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या वनडेमध्ये कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती जी आता अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने 18 वर्षांनंतर मागे टाकली आहे. एकूणच, पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय क्रिकेटमधील ही सहावी सर्वोच्च धावसंख्या आहे.
Rahmanullah Gurbaz is the first wicketkeeper to score a 150 in men's ODIs against Pakistan 🇦🇫
The previous highest was by MS Dhoni in Visakhapatnam pic.twitter.com/vwRFXsnwhE
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)