GT vs PBKS, IPL 2024 17th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 17 व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्जशी (GT vs PBKS) होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने लीगमध्ये आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्जने 3 पैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना गुजरातने पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्ये ठेवले आहे. गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर शुभमन गिलने नाबाद 89 धावांची शानदार खेळी केली. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक दोन बळी घेतले. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 200 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला दुसरा धक्का लागला आहे. पंजाबचा स्कोर 48/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)