PAK vs NZ: आयसीसी वनडे वर्ल्ड कपची (ICC Cricket World Cup 2023) तारीख आता अगदी जवळ आली आहे. अशा स्थितीत हळूहळू सर्व बाबी समोर येत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) सोमवार 25 सप्टेंबर रोजी पाकिस्तान क्रिकेट संघाशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची माहिती शेअर केली. पाकिस्तान संघ हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. 29 सप्टेंबरला आयसीसी विश्वचषक सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात एक सराव सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याबाबत बीसीसीआयकडून विशेष माहिती देण्यात आली आहे. हैदराबादमध्ये खेळल्या जाणार्या या सामन्याबाबत सांगण्यात आले आहे की, हा सामना प्रेक्षकांमध्ये नसून रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
ICC CWC 2023 warm-up match update.
The warm-up match between New Zealand and Pakistan scheduled to take place in Hyderabad on 29th September will now take place behind closed doors as per the advice of the local security agencies.
More details here - https://t.co/eKoFEZ4u94… pic.twitter.com/24PwvIkg7m
— BCCI (@BCCI) September 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)