South Africa National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा उपांत्य सामना 5 मार्च (बुधवार) रोजी लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यामुळे दक्षिण आफ्रिका प्रथम गोलंदाजी करेल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण 73 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 42 सामने जिंकले आहेत, न्यूझीलंडने 26 सामने जिंकले आहेत आणि पाच सामने अनिर्णीत राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज जो संघ जिंकेल तो भारतासोबत अंतिन सामना खेळेल.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (डब्ल्यू), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरर्के

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)