पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेची सुरुवात 18 एप्रिल रोजी रावळपिंडी येथे होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे. या मालिकेतील सामने 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 मध्ये खेळवले जाणार आहेत. आयपीएल (IPL 2024) पेक्षा किती किवी स्टार्स या दौऱ्याला प्राधान्य देतील हे पाहणे रंजक ठरेल. न्यूझीलंड टी-20 संघाचे अनेक खेळाडू आयपीएलमधील संघांचा भाग आहेत. ज्यामध्ये रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसनसह इतर खेळाडूंचा समावेश आहे. (हे देखील वाचा: IPL 2024: प्रतीक्षा संपली! ऋषभ पंत दिल्लीच्या जर्सीमध्ये मैदानात परतला, सराव करताना फोटो व्हायरल)

पाहा वेळापत्रक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)