Rishabh Pant Back: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर ऋषभ पंतने (Rishabh Pant) क्रिकेट किट परिधान करण्याची वेळ आली आहे. ऋषभ दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे आणि त्याने आगामी आयपीएल 2024 साठी सराव सुरू केला आहे. नुकतीच स्वतः डीसी यांनी ही माहिती दिली असून एक पोस्टही शेअर केली आहे. पंतने शेवटचा क्रिकेट सामना मे 2022 मध्ये खेळला होता. यानंतर डिसेंबर 2022 मध्ये तो एका अपघाताचा बळी ठरला आणि तेव्हापासून तो परतण्याची वाट पाहत आहे. अलीकडेच बीसीसीआयने ऋषभला विकेटकीपिंग आणि फलंदाजी या दोन्हीसाठी तंदुरुस्त घोषित केले आहे. यानंतर तो आगामी आयपीएलच्या तयारीत पूर्णपणे गुंतला आहे. (हे देखील वाचा: ICC Test Rankings: बुमराहचे नुकसान! अश्विन आयसीसी कसोटी क्रमवारीत ठरला अव्वल क्रमांकाचा गोलंदाज; टॉप-10 मध्ये अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)