ENG vs NZ World Cup 2023: आयसीसी क्रिकेट विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) आजपासून सुरू झाला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्युझीलंडने इंग्लंडला पराभूत करुन (ENG vs NZ) विजयाची सलामी दिली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तत्तपुर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाने निर्धारित 50 षटकांत नऊ गडी गमावून 282 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक 77 धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकात 283 धावा करायच्या होत्या. तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने विकेट राखुन हा सामना जिंकला.
- Devon Conway 152* (121).
- Rachin Ravindra 123 (96)*.
- A partnership of 273* in just 214 balls. One of the greatest partnerships you'll see in World Cup history, New Zealand hammered England. pic.twitter.com/YUbBwug0a6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)