MI vs RCB: आयपीएल 2024 च्या 25 व्या (IPL 2024) सामन्यात गुरुवारी मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (MI vs RCB) झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावा केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिस (61), रजत पाटीदार (50) आणि दिनेश कार्तिक (53) यांनी अर्धशतके केली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 15.3 षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना 7 गडी राखून जिंकला. एमआयचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयानंतर मुंबईने सातव्या स्थानी तर बंगळुरू नव्यास्थानी आहे.

पाहा पॉइंट टेबलची स्थिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)