सोमवारी शारजाह येथे झालेल्या T20 विश्वचषक 2021 मध्ये श्रीलंकेवर विजय मिळवून इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन हा सर्वात यशस्वी T20I कर्णधार बनला आहे. मॉर्गनने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अफगाणिस्तानच्या असगर अफगाण यांना या फॉरमॅटमध्ये 43 विजयांसह मागे टाकले. आयर्लंडमधून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या 43 वर्षीय इऑन मॉर्गनने 2012 मध्ये भारताविरुद्धच्या T20I मध्ये पहिल्यांदा इंग्लंडचे नेतृत्व केले. त्यानंतर 2015 पासून तो इंग्लंडचे नेतृत्व करत आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)