आशिया चषक स्पर्धेतील (Asoa Cup 2023) भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील अंतिम सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या फलंदाजांची तारांबळ उडवली. सिराजने पहिल्याच षटकात चार बळी घेत श्रीलंकेच्या महत्त्वाच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मोहम्मद सिराज आशिया चषकाच्या अंतिम सामन्याचा शेवट होण्याआधीच पहिल्या 15 चेंडूत 5 विकेट घेत हिरो बनला आहे. त्याचबरोबर एकाच षटकात चार बळी घेण्याचा पराक्रम करणारा सिराज पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. आजपर्यंत भारतीय संघाच्या क्रिकेट इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोललो तर सिराज व्यतिरिक्त फक्त श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने वनडे सामन्यात एका ओव्हरमध्ये चार विकेट घेतल्या होत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)