इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या (IPL 2023) हंगामातील पहिला एलिमिनेटर सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ 26 मे रोजी गुजरात टायटन्ससोबत दुसरा क्वालिफायर सामना खेळेल, तर स्पर्धेतील पराभूत संघाचा हा शेवटचा सामना असेल. लखनौ सुपर जायंट्सने मागील हंगामात म्हणजे आयपीएल 2022 मध्ये एलिमिनेटर सामना देखील खेळला होता, ज्यामध्ये लखनऊ संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 182 धावा केल्या. मुंबई इंडियन्स संघाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 44 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लखनौ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 183 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघाला दुसरा मोठा झटका बसला. लखनौ सुपर जायंट्सचा संघ स्कोअर 27/2 आहे.
ELIMINATOR. 3.4: Chris Jordan to Marcus Stoinis 4 runs, Lucknow Super Giants 27/2 https://t.co/a4uIgpVwil #Eliminator #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)